Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : भरधाव दुचाकी थेट गोदावरी नदीपात्रात कोसळली, महिलेसह २ तरुण बुडाले; वैजापुरातील खळबळजनक घटना

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या कमलपुर- देवगाव शनि बंधाऱ्याहून मोटरसायकलसह तिघेजण गोदावरी नदीत पडले. यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघांचा शोध सुरु आहे. या घटनेंत बंधाऱ्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. तर दुसऱ्या एका घटनेत नदीत बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यात यश मिळाले आहे. 

संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील वैजापूर- श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदी आहे. या नदीवर असणारा कमलापुर बंधारा आहे. या बंधाऱ्यावरून शनि देवगावहून कमलपुरकडे मोटासायलवर जात असताना गाडीचा तोल जाऊन (Godavari River) मोटारसायकसह तिघे पाण्यात पडून वाहून गेले. बंधाऱ्याला कठडा नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. नदीत पडलेले तिघेही कमलपूर (ता. श्रीरामपूर) येथिल आहेत. 

सदर घटना येथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने यनुबाई मनोहर बर्डे या महिलेचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले. तर दिलीप सोमनाथ बर्डे यातील रवी सोमनाथ मोरे यांचा उशिरापर्यंत शोध घेणे चालू आहे. ही घटना १२ ओक्टोम्बरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. विरगांव पोलिस श्रीरामपूर पोलिस घटनास्थळी हजर झाले आहे.

नदीत बुडणाऱ्या महिलेला वाचविले 

जिल्ह्यातील कायगाव येथे छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर महामार्गावरील गोदावरी नदीत उडी घेतलेल्या एका ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीला पाण्यात बुडत होती. या महिलेला वाचवून जीवरक्षकांनी जीवनदान दिले. संभाजीनगर पुणे महामार्गावर जात असताना अचानक पुलाच्या खाली एक व्यक्ती तरंगत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तातडीने लोकांची अडवर्ड सुरू झाली. त्यावेळी त्या परिसरात असल्यास जीवनरक्षकांनी नदीत उड्या मारून जीव वाचवला. मात्र हा व्यक्ती नदीमध्ये पोहण्यासाठी उडी मारला होता की जीव देण्याचे मारला होता याद्या स्पष्ट झाले नाही कारण तो घाबरलेल्या अवस्थेत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या, निगडी परिसरात खळबळ

VIDEO : महायुतीचं रिपोर्ट कार्ड; अडीच वर्षांतील कामाचा दिला लेखाजोखा

Maharashtra News Live Updates : संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

World food day: तुम्हाला माहितीये का फूड एलर्जी आणि फूड इंटोलेरेंसमधील नेमका फरक? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

Kojagiri Purnima Milk : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्याघरी बनवा मसाला दूध; वाचा सिंपल आणि परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT