Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: ...तर महिला सरपंचाचे पद जाऊ शकते; ग्रामपंचायतीतील सरपंचांच्या पतींची लूटबूड थांबणार

Rajesh Sonwane

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्था असो कि ग्रामपंचायत येथे महिला कारभारी असल्या कि तेथे पतीराज सुरु असते. (Gram Panchayat) ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप अधिक वाढत चालला आहे. परंतु सरकारने पतिराजांची ही लुडबुड आता थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. पडद्यामागून पुरुष मंडळी ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असल्याचे दिसल्यास ते आता (Sambhajinagar) अंगलट येऊ शकतो. याबाबत तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यास त्यांच्या अहवालानुसार विभागीय आयुक्त हे संबंधितांचे सरपंच पद रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात. (Latest Marathi News)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Election) महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. पदावर महिला कारभारी असल्या कि त्यांचे पतीच कारभार चालवताना दिसतात. काही ग्रामपंचायतींमध्ये तर त्यांची मुले देखील कारभार चालवताना दिसतात. विरोधकांकडून यावर आवाजही उठवण्यात आला. आता यापुढे पती किंवा इतर नातेवाईकांनी हस्तक्षेप केल्याच्या आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाईचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वाढता हस्तक्षेप थांबवण्यासाठी २००७ मध्येच राज्य शासनाने निर्णय जाहीर केला होता. यानंतर प्रशासनही अलर्ट मोडवर आले. यामुळे काही प्रमाणात का होईना, सरपंच पती किंवा त्यांच्या नातेवाईकांची ग्रामपंचायत येथील लुडबुड बंद झाली होती. मात्र आता मोठ्या प्रमाणात ही लुडबुड पुन्हा सुरू झाली आहे.  

आता ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच असलेल्या ठिकाणी महिला सरपंचाचे पती किंवा इतर नातेवाईकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यावर दबाव आणणे; अथवा संबंधितांच्या खुर्चीवर बसणे किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे गैरवर्तवणूक करणे या विरोधात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील ३९ कलमान्वये कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यात ५६२ महिला सरपंच निवडून आले आहेत. यापैकी काही सरपंच पतीकडून आजही ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप सुरू असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी पदाचा व अधिकाराचा गैरवापरही केल्या जाऊ शकतो. यामुळे आता या विरोधात राज्य शासन आणि प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे ठरवल्यामुळे अशा घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT