Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : १ एप्रिलपासून खुले भूखंड, प्लॉटला लागणार कर; संभाजीनगर मनपाचा निर्णय

Sambhajinagar News : आगामी आर्थिक वर्षात संभाजीनगर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा निर्णय मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला असून त्यासाठी मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविणे यावर भर देण्यात येत आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शहरात असलेले खुले भूखंड आणि प्लॉटवर कर आकारणी केली जात नव्हती. मात्र आता याची कर आकारणी करण्याचा निर्णय (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर महापालिकेने घेतला आहे. याची अंमलबजावणी येत्या नवीन आर्थिक वर्षांपासून केली जाणार आहे. (Breaking Marathi News)

आगामी आर्थिक वर्षात संभाजीनगर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा निर्णय मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला असून त्यासाठी मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविणे यावर भर देण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत ज्या मालमत्ता (Tax) कर आकारणीतून सुटल्या आहेत. त्यांचा शोध घेऊन त्या मालमत्तांना नवीन रेडीरेकनरच्या दरानुसार कर आकारणी केली जाणार असून तसे निर्देशही आयुक्तांनी सर्व झोन कार्यालयांना दिले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ एप्रिलपासून कर आकारणी 

संभाजीनगर शहरातील खुले भूखंड व प्लॉट धारकांनी आपापल्या मालमत्तांना कर आकारणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र अजूनही शहरातील बहुतांश खुल्या भूखंड धारकांनी कर आकारणी केली नसल्यामुळे त्यांच्याकडून कर आकारणी करण्याचा निर्णय मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. १ एप्रिलपासून या मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, आता १४ आमदार फुटणार? शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ

Black Rain : 'काळा पाऊस' कोसळला; नागरिक हबकले, मॉस्कोमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

PhonePe Alert: PhonePe युजर्सला झटका! व्यवहार न करताही पैसे कापले जाणार, नवा नियम काय?

Sangli Crime News: कॅफेत बोलावलं अन्...; सांगलीत अल्पवयीन तरुणीसोबत घडलं क्रूर कृत्य

सर्वात स्वस्त साड्या कुठे मिळतात? महिलांना माहितीये का 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT