Phulambri Market Saam tv
महाराष्ट्र

Phulambri Market : फुलंब्रीत पहिल्याच दिवशी कांद्याला २१०० पर्यंत दर; खरेदी विक्री केंद्रास सुरवात

Sambhajinagar News : कांदा उत्पादन घेतल्यानंतर देखील कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर व इतर ठिकाणी जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा खर्च लागत होता

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. कांदा काढणीनंतर शेतकऱ्यांना विक्रीसाठी कांदा बाहेर न्यावा लागत होता. यामुळे जिल्ह्यात कांदा खरेदी विक्री केंद्र सुरु करण्याची मागणी होती. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे कांदा खरेदी विक्री केंद्रला सुरुवात झाली असून आजच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी असून यंदा देखील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. परिसरात कांदा उत्पादन घेतल्यानंतर देखील कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर व इतर ठिकाणी जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा खर्च लागत होता. परिणामी शेतकऱ्यांना मिळणार भाव व वाहतुकीसासाठी लागणार खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. 

पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची गर्दी 

दरम्यान तालुक्यात कांदा खरेदी विक्री केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. शेतकऱ्याची वाढती मागणी लक्षात घेऊन फुलंब्री मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या संकल्पनेतून कांदा लिलाव प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात राबविण्यात आली. याची सुरूवात आजपासून (१ जून) करण्यात आली. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी कांदा विक्रीसाठी दाखल झाले होते. 

२१०० रुपयांपर्यंत मिळाला भाव 

दरम्यान आजच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणला होता. छत्रपती संभाजीनगरसह इतर ठिकाणाहून व्यापारी लिलावात सहभागी झाले होते. या कांदा लिलाव प्रक्रियेत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १६०० ते २१०० रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT