Sakshi Sunil Jadhav
चाणक्य नीतीनुसार अस्वच्छ कपडे आणि शरीराची स्वच्छता न राखणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचणी वाढू शकतात.
रोजच्या रोज दात स्वच्छ न ठेवण्याची सवय ही शिस्तीच्या अभावाचं लक्षण मानली जाते आणि अशा व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
इतरांशी सतत कठोर किंवा कडवट शब्दांत बोलल्याने नातेसंबंध बिघडू शकतात, त्यामुळे वाणीमध्ये नम्रता ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
काम पुढे ढकलण्याची आणि सतत आराम करण्याची सवय प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकते, असं चाणक्य नीतीत सांगितलं आहे.
भूक आणि जिभेवर नियंत्रण नसल्यास अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आहारात संयम ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे.
आपल्या कमाईपेक्षा अधिक खर्च करण्याची सवय आर्थिक अडचणी निर्माण करू शकते; त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
नियमितपणा, जबाबदारी आणि योग्य सवयी अंगीकारल्यास आर्थिक व्यवहार अधिक व्यवस्थित ठेवण्यास मदत होऊ शकते.
चाणक्य नीतीमध्ये सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर झोपण्याची सवय टाळण्याचा उल्लेख आढळतो.
धन मिळवण्यासोबतच ते टिकवणेही महत्त्वाचे असून बचत, योग्य खर्च आणि आर्थिक शिस्तीवर भर देणे आवश्यक आहे.