Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीला व्हीआयपी वागणूक, बिर्याणी देणे पडले महागात; ३ कर्मचाऱ्याचे निलंबन

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात एनडीपीएस पथक आणि वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन दिवसांपूर्वी अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने भंगार व्यावसायिकांच्या गोडाऊनवर छापे टाकले

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात सव्वा कोटी रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा सापडून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन गोदाम सील केली होती. तर या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीना पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक देत खाण्यास बिर्याणी देण्यात आली होती. मात्र हि बिर्याणी देणे एनडीपीएसच्या  कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले असून तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात एनडीपीएस पथक आणि वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन दिवसांपूर्वी अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने भंगार व्यावसायिकांच्या गोडाऊनवर छापे टाकले. या कारवाईत साधारण दीड किलो एमडी ड्रग्स ज्याची किंमत सव्वा कोटीच्या घरात आहे. हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत दोन गोडावून सील करण्यात आले होते. तर तीन जणांना ताब्यात घेतले होते.

आरोपीला दिली बिर्याणी 

छत्रपती संभाजीनगरच्या वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचारी व्हीआयपी ट्रीटमेंट देत होते. इतकेच नाही तर त्यांना बिर्याणी पुरवत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या या प्रकाराचा व्हिडीओ साम टीव्हीने दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले असून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. 

तिघांवर निलंबनाची कारवाई 

पोलीस या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपी आणि त्याचे मित्र चिकन तंगडीची पार्टी करत असल्याचे दिसून येत आहे. याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केल्यानंतर याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र या  तीन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

SCROLL FOR NEXT