Marathwada Rain Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाची दडी; शेतातील पिके धोक्यात, बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

Sambhajinagar News : पेरणीनंतर चांगला पाऊस झाला नसल्याने लातूर, धाराशिव, नांदेड, बीड आणि जालना जिल्ह्यातील काही भागात पिकाची परिस्थिती नाजूक झाली आहे; यामुळे शेतकरी चिंतेत असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या जोरदार पाऊस नसल्याने काही ठिकाणी पिके धोक्यात आली आहेत. तर काही ठिकाणी हलक्या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळत आहे. संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित मराठवाड्यातल्या सातही जिल्ह्यात पिकाची परिस्थिती फारशी चांगली नाही. पेरणीनंतर चांगला पाऊस झाला नसल्याने लातूर, धाराशिव, नांदेड, बीड आणि जालना जिल्ह्यातील काही भागात पिकाची परिस्थिती नाजूक झाली आहे. 

जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट 
जालना जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ११ टक्केच उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या १४६ मिलिमीटर म्हणजे २४ टक्केच पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कमी असल्याने प्रकल्पांतील पाणीपातळीत वाढ झाली नाही.

बीड जिल्ह्यात पावसाची दडी 
बीड जिल्ह्यात जवळपास दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने हळूहळू पाण्याची चिंता वाढत चालली आहे. शेतकऱ्यांसह नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. लहान- मोठ्या अशा १६७ प्रकल्पांत केवळ २७.७८ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिन्यात केवळ ५९ टक्केच पाऊस झाला आहे. तर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून ते १४ जुलै या कालावधीत एकूण ८०.०९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसाअभावी पिके कोमेजली 
लातूर जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पिके कोमेजू लागली आहेत. येत्या चार दिवसांत पाऊस न झाल्यास कोवळी पिके वाळण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच सिंचनाची सोय असलेले शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०१.८ मिमी पाऊस झाला आहे. 

धाराशिवमध्येही पावसाची प्रतीक्षा 

धाराशिव जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर एकही मोठा पाऊस न झाल्याने सुमारे ५ लाख हेक्टरवरील कोवळी पिके धोक्यात आली आहेत. आतापर्यंत केवळ १३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या २० तारखेपर्यंत जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांमध्ये ४० टक्के जलसाठा झाला होता. १४ जुलै रोजी हा साठा ४१ टक्के इतका आहे. हीच परिस्थिती नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT