Sambhajinagar Rain Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा

Sambhajinagar News : पाचोड, बालानगर, कडेठण यासह परिसरातील काही गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 
छत्रपती संभाजीनगर
: राज्यात मान्सूनचे आगमन झाले असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरासह तालुक्यातील काही गावात आज दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पाचोड, बालानगर, कडेठण यासह परिसरातील काही गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस (Rain) झाला. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. 

पेरणीला होणार सुरवात 

दमदार पावसाची शेतकरी (Farmer) आतुरतेने वाट पाहत होता. दरम्यान आज दुपारी चांगला पेरणी योग्य पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र मान्सून पूर्व पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT