Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : मंगल कार्यालयात गुटखा बनवण्याच्या कारखाना; पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई

Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद परिसरातील खिर्डी येथील मंगल कार्यालयात सुगंधित अगरबत्ती बनवण्याच्या नावाखाली गुटखा पॅकिंगचे काम सुरु होते

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खीर्डी या ठिकाणी एका मंगल कार्यालयात गुटखा तयार करून त्याची पॅकिंग केली जात होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या मंगल कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या ठिकाणाहून काही मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील खुलताबाद परिसरातील खिर्डी येथील मंगल कार्यालयात सुगंधित अगरबत्ती बनवण्याच्या नावाखाली गुटखा पॅकिंगचे काम सुरु होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुटखाच्या कारखान्यावर पोलिसांनी (Police) छापा टाकला. दरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री करण्यासाठी हा साठा केला असल्याचं निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांकडून ही करवाई कऱण्यात आली आहे.

चौघांवर गुन्हा दाखल 

खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिरडी येथील घटना;सुगंधित अगरबत्ती बनविण्याच्या नावाखाली गोरख धंदा सुरू होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत साधारण २५ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी २ वाहने आणि इतर संपूर्ण साहित्य देखील जप्त केले आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT