Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : पगार थकल्याने ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक; ग्रामपंचायत कार्यालयात केली तोडफोड

Sambhajinagar News : संतप्त झालेल्या पाणीपुरवठा आणि सफाई, घंटागाडी, शिपाई कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्चा फेकून खिडकी आणि सरपंच यांच्या दालनातील काचा आणि नेम प्लेट फोडून निषेध

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडुळ ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांपासून पगार थकले आहेत. दिवाळीचा सण आला असताना देखील पगार न झाल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून कर्मचाऱ्यांनी आडूळ ग्रामपंचायतीमध्ये तोडफोड केली. 

संभाजीनगर जिल्ह्यातील आडुळ ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. वारंवार विनंती करूनही पगार देत नसल्याने संतप्त झालेल्या पाणीपुरवठा आणि सफाई, घंटागाडी, शिपाई कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्चा फेकून खिडकी आणि सरपंच यांच्या दालनातील काचा आणि नेम प्लेट फोडून निषेध व्यक्त केला. एप्रिल २०२४ पासून म्हणजेच सात महिन्यांचा पगार ग्रामपंचायतीकडे थकला होता. या संबंधी सदरील सर्व कर्मचारी यांनी आम्हाला आमचा थकलेला पगार द्या; अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली होती. 

परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने गुरुवारी पाच वाजेच्या सुमारास सहा कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी ६ हजार तर दोन सफाई कामगार यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये बोनस जमा केला. परंतु या अल्प रकमेत दिवाळी सण कसा साजरा करावा, असे म्हणत सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदरील कर्मचारी यांनी तोडफोड करून निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT