Ghati Hospital Saam tv
महाराष्ट्र

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Sambhajinagar News : गेल्या एक वर्षापासून आम्ही रुग्णालय प्रशासनाला नवीन कक्ष सुरू न करण्याची विनंती करत आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून समस्या आहेत. या (Sambhajinagar) समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मागील काही वर्षांपासून नर्सेस संघटनेची मागणी आहे. तरी देखील समस्या सुटत नसल्याने घाटी हॉस्पिटलमधील नर्सेस संघटनेने आज सकाळी दोन तास काम बंद आंदोलन करत निषेध निदर्शने केली.  

संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये नवीन कक्ष सुरू केले. मात्र, पद भरती न केल्यामुळे परिचारिकांवर कामाचा ताण वाढतो आहे. त्यामुळे निषेध म्हणून परिचारिकांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या एक वर्षापासून आम्ही (Ghati Hospital) रुग्णालय प्रशासनाला नवीन कक्ष सुरू न करण्याची विनंती करत आहे. कमी मनुष्यबळ असल्याने मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी मागील काही वर्षांपासून आहे. 

घाटी रुग्णालयातील या समस्यांबाबत नर्सेस संघटनेकडून आणि नर्सेसकडून वारंवार विनंती करण्यात येत आहे. मात्र ती काम केली जात नाही. सोबतच रुग्णांसाठी देखील मोठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आज नर्सेस संघटनेने आपल्या विवीध मागण्यांसाठी २ तास काम बंद आंदोलन केले. यामुळे काही वेळ घाटी रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

SCROLL FOR NEXT