Sambhajinagar Airport Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Airport : संभाजीनगरमधून आता थेट सिंगापूर, बँकॉकसाठी विमान सेवा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून स्पाइस जेट, टू जेट, एअर इंडिया आणि इंडिया या विमान कंपन्यांकडून विविध मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात आल्या होत्या.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : एअर एशिया विमान कंपनीकडून सिंगापूर आणि बँकॉक शहरासाठी आता छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) येथून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाची यासाठी कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून स्पाइस जेट, टू जेट, एअर इंडिया आणि इंडिया या विमान कंपन्यांकडून विविध मार्गांवर (Airline) विमानसेवा सुरू करण्यात आल्या होत्या. प्रामुख्याने (Mumbai) मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद या शहरांसाठी विमान सेवा आहे. दरम्यान अहमदाबादची सेवा मध्यंतरी काही कारणास्तव बंद झाली होती. मात्र ३ मार्चपासून हि सेवा देखील नव्याने सुरु करण्यात येत आहे. यानंतर आता एअर आशिया कंपनीकडून नवीन सेवा जोडण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पर्यटन, उद्योगासाठी चालना 

नवीन विमान सेवा सुरु होत असल्याने आता संभाजीनगर शहरातून थेट सिंगापूर आणि बँकॉकसाठी विमान उपलब्ध झाल्यास पर्यटन आणि उद्योगाचे टेकऑफ होण्यास चालना मिळेल. मलेशियन कंपनी असणाऱ्या एअर एशिया या विमान कंपनीने वर्ष अखेरपर्यंत देशातील ६ शहरांमधून उड्डाण करण्याची नियोजन केले असून त्यामध्ये संभाजीनगर शहराचा देखील समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT