Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : मद्यधुंद कार चालकाची तीन कारला धडक; पाचजण झाले फरार, संभाजीनगरातील घटना

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक शहरात हिट अँड रनच्या घटना घडल्या आहेत. यातच आज मध्यधुंद कार चालकाने भरधाव वेगाने कार आणत घरासमोर उभ्या असलेल्या दोन ते तीन कारला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कारमधील पाचही जण फरार झाले असून सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar News) शहरातील एन टु भागात हि घटना घडली आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी सुसाट कारने धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर कडून एन टू भागाकडे जाणाऱ्या एका मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने इतर दोन कारला धडक दिल्याची घटना घडली. या कारमध्ये ४ ते ५ जण बसलेले असून कार चालक सुसाट वेगात ही कार चालवीत होता. यातच त्याने कारला धडक दिली.  

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरासमोर उभ्या असलेल्या दोन कारचे यात मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर कारमधील मद्यधुंद अवस्थेत असलेले ४ ते ५ जण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी एकत्र येऊन येथे जाळपोळ देखील केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

Uddhav Thackeray: 15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं

Uddhav Thackeray : भाजपच्या रोपट्याला गुलाबी अळी लागली, ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागली

Goa : गोव्यातील 'या' गावाची पर्यटकांना पडली भुरळ

Akshay Shinde Funeral: अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण, मोठ्या पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT