Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : धोकादायक होर्डिंग उभेच; २४ तासांचा अल्टिमेटम संपला तरीही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Sambhajinagar news : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यभर होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर शहरातील लागलेल्या होर्डिंग्ज बाबत महापालिका प्रशासनाने ऑडिट केले. यात शहरातील सर्वच होर्डिंग्जची मुदत संपल्याचे समोर आल्याने याबाबत महापालिकेने २४ तसंच अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र अल्टिमेटम सम्पल्यानंतर देखील मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. 

मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर राज्यभर होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता. दरम्यान या दुर्घटनेनंतर जागे झालेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेने २४ तासात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील होर्डिंग्सवाल्यांनी दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटची मुदत मार्च २०२४ मध्ये संपल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने शहरातील सर्वच होर्डिंग धोकादायक ठरले होते. 

मनपा प्रशासन झोपलेलेच 

मात्र हा अल्टीमेटम संपल्यावरही महापालिका प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही. इतकंच नव्हे तर शहरातील धोकादायक इमारती सील केल्या जातील आणि होर्डिंग्स काढून टाकण्यात येतील असा कडक इशाराही महापालिकेने दोन दिवसापूर्वी दिला होता. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT