Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : धक्कादायक! विकत घेतलेला कट्टा चालवायचा कसा माहीत नाही; गोळी सुटली अन् अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कपाळात घुसली

धक्कादायक! विकत घेतलेला कट्टा चालवायचा कसा माहीत नाही; गोळी सुटली अन् अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कपाळात घुसली

Rajesh Sonwane

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : खाजगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने गावठी कट्टा विकत घेतला. पण हा कट्टा चालवायचा माहीत (sambhajinagar) नसल्याने गोळी सुटली आणि यामध्ये त्याच्याच अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ (Police) रुग्णाला दाखल करण्यात आले. मात्र काल रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. अवघ्या ४८ तासात त्याची मृत्यूची झुंज संपली. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील गंगापूर शहरात उघडकीस आली आहे. (Tajya Batmya)

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर शहरातील अहिल्यादेवी नगरात राहुल राठोड पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलासह राहतो. राहुल कर्ज वितरण करणारा एका बँकेत वसुलीचे काम करतो. दरम्यान आपल्या कामात वसुली करण्याची गरज पडते. यामुळे त्याने गावठी कट्टा विकत घेतला. तो कट्टा २५ ऑगस्टला घरी घेऊन आला. पण हा गावठी कट्टा नेमका चालवायचा कसा याबाबत राहुलला कोणतीही माहिती नव्हती. दरम्यान घरी आल्यावर सायंकाळच्या सुमारास आणलेला गावठी कट्टा तो आपल्या पत्नीला दाखवत होता. याचवेळी कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. यामध्ये चिमुकला आर्यन राठोड हा गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रकरणाची चौकशी केली. यात राहुलला ताब्यात घेऊन अटक केली.

आईचा आक्रोश 
आर्यनच्या कपाळात गोळी लागल्यानंतर तो अत्यावशता अवस्थेत होता. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. तेव्हापासून तो घाटीतील अतिदक्षता विभागात होता. त्याचा धोका टळलेला नव्हता, त्याची मृत्यूची झुंज सुरूच होती. मात्र दुर्दैवाने ४८ तासानंतर त्याची मृत्यूची झुंज संपली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देताच आर्यनच्या आईने रुग्णालयातच टाहो फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Water Cut: मोठी बातमी! संपूर्ण राज्यात १० टक्के पाणी कपात, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

Refrigerator electricity consumption: फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडल्याने वीजबिल वाढतं का?

कोकणात राजकीय राडा! ठाकरेंच्या बड्या नेत्याला राहत्या घरातून अटक; आमदार राणेंवर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी

माहूर घाटात टेम्पो दरीत कोसळला, ३ भाविकांचा मृत्यू, ५ गंभीर; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला

SCROLL FOR NEXT