RTO Action Saam tv
महाराष्ट्र

RTO Action : विना हेल्मेट वाहन चालवणे पडले महागात; एकाच महिन्यात आरटीओकडून ९ लाखाचा दंड वसूल

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : वाहन चालवीत असताना वाहतुकीचे नियम पाळण्यात यावे; याबाबत आरटीओ कडून वारंवार आवाहन केले जात असते. मात्र नियमांचे उल्लंघन केले जात असते. त्यानुसार संभाजीनगरमध्ये विना हेल्मेट आणि वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर आरटीओने कारवाई केली असून मागील महिन्यात तब्बल ९ लाख रुपयांचा दंड वासून केला आहे.  

छत्रपती संभाजी नगर (Sambhajinagar) शहरासह जिल्हाभरात विना हेल्मेट आणि वेगात वाहन चालवणाऱ्या वाहनधारकावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने करडी नजर ठेवून होते. त्यानुसार गेल्या महिन्यात ४४६ वाहन धारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे ८ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. परिवहन विभागाच्या पथकाने (RTO) जिल्हाभरात ही मोहीम राबवून विना हेल्मेट चालविणाऱ्या ३७३ तर क्षमतेपेक्षा जास्त वेगाने पळविणाऱ्या ७३ जणांविरुद्ध ही दंडात्मक कारवाई केली. 

स्कूल बसचीही तपासणी 

दरम्यान शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसची तपासणी देखील आरटीओने सुरू केली आहे. या तपासणीत मागील पंधरा- वीस दिवसात आतापर्यंत २५० स्कूल बस तपासल्या आहेत. मात्र तपासणीत काही कमतरता असल्यास बस जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कुठलाही पुतळा उंच असू नये असं ठरवलं असेल; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

Bigg Boss Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर रितश भाऊंचा कल्ला...२ आठवड्यानंतर भऊच्या धक्क्यावर पुन्हा एन्ट्री

SCROLL FOR NEXT