Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : संभाजीनगरच्या विकास आराखड्यावर ५ हजार आक्षेप; चुकीच्या पद्धतीने टाकले आरक्षण

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहराचा प्रारूप आराखडा अतिशय घाईगडबडीत केवळ ३ महिन्यात सादर करण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर शहरासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु आराखडा तयार झाल्यापासून आतापर्यंत आराखड्यावर ५ हजार आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. (Sambhajinagar) घाईगडबडीने तयार केलेल्या या आराखड्यात अनेक भागावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आल्याने हा गोंधळ उडाला आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर शहराचा प्रारूप आराखडा अतिशय घाईगडबडीत केवळ ३ महिन्यात सादर करण्यात आला आहे. यामुळे या आराखड्यात अनेक भागावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आल्याने शहरातील (Development Plan) नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या या आराखड्यावर गेल्या ४० दिवसात आतापर्यंत सुमारे ५ हजार अक्षेप दाखल झाले. आणि सूचना आणि हरकतीसाठी आणखी २० दिवस शिल्लक असल्याने आक्षेपंचा आकडा किमान ७ हजारावर पोहोचण्याची शक्यता आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजूनही १९८२ च्या आराखड्याप्रमाणे चालतेय काम 

विकास आराखडा अभावी मागील ३३ वर्षापासून शहराचा विकास खुंटला आहे. १९८२ सालच्या आराखड्याचीच आजही अंमलबजावणी केली जात असल्याने खुंटलेल्या विकासाला चालना मिळावी; यासाठी ३३ वर्षानंतर विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र त्यातही अनेक वसाहतीवर अनावश्यकपणे आरक्षण टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT