Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : साखरेचे भाव वाढणार असल्याचे सांगत व्यापाऱ्यालाच गंडविले; ४० लाखात केली फसवणूक

Sambhajinagar News : साखरेचे भाव लवकरच वाढणार असून तुम्ही साखर खरेदी केल्यास चांगला नफा मिळेल असे अमिष दाखवले. तसेच व्यापारी गौरव यांचा विश्वास संपादन केला.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : साखरेचे भाव वाढणार असल्याचे सांगत छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील वाळूज उद्योग नगरीतील एका व्यापाऱ्याला तब्बल ४० लाखांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सांगलीतल्या दोघा भावंडांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संभाजीनगरमधील गौरव अरुणकुमार चव्हाण असे फसवणूक (Fraud) झालेल्या उद्योजकाचे नाव असून त्यांची एक कंपनी आहे. शिवाय ते साखर खरेदी करून त्यांना साखर विक्री करत असतात. मात्र या दोन भामट्यांनी त्यांना साखरेचे (Sugar) भाव लवकरच वाढणार असून तुम्ही साखर खरेदी केल्यास चांगला नफा मिळेल असे अमिष दाखवले. तसेच व्यापारी गौरव यांचा विश्वास संपादन केला. 

यावर उद्योजकाने विश्वास ठेवून १२० क्विंटल साखर खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी साखर खरेदीसाठी आपल्या बँक खात्यातून रोख स्वरूपात ४० लाख रुपये देखील दिले. मात्र साखर पुरवठा होत नसल्याने फसवणूक झाल्याची ही बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत दोघांविरुद्ध तक्रार दिली असून यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT