Sambhajinagar Bike And Pickup Accident Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशीच जिवलग मित्रांचा मृत्यू

Sambhajinagar Bike And Pickup Accident: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड- भराडी रोडवर असणाऱ्या बोरगावजवळ भीषण अपघात झाला. दुचाकी आणि पिकपच्या भीषण अपघातामध्ये दोन मित्रांचा मृत्यू झाला.

Priya More

रामनाथ ढाकणे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची (Sambhajinagar Accident) घटना घडलीये. दुचाकी आणि पिकअपमध्ये धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे देघेही जीवलग मित्र होते. कन्नड-भराडी रोडवरील बोरगाव बाजार फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघाताचा तपास संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड- भराडी रोडवर असणाऱ्या बोरगावजवळ भीषण अपघात झाला. दुचाकी आणि पिकपचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही खूप चांगले मित्र होते. मैत्री दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणेश निकम आणि आशिष परमेश्वर अशी या जीवलग मित्रांची नावं आहेत. दोघेही कन्नडकडून भराडीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी एका भरधाव पिकअपला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी पाठीमागून वेगामध्ये आलेल्या गणेश आणि आशिषची दुचाकी पिकअपवर जोरदार आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की गणेश निकम आणि आशिष परमेश्वर जमिनीवर जोरात आदळले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मैत्री दिनाच्या दिवशीच दोन जीवलग मित्रांनी आपले प्राण गमावल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश आणि आशिष यांच्या कुटुंबींना मोठा धक्का बसला. तर दोघे राहत असलेल्या गावांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या संभाजीनगर पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : लग्नाहून येताना पूलावर नदीत कोसळली कार, ५ जणांचा जागेवरच मृत्यू

Uttan Virar Sea Link: नरिमन पॉईंट ते विरार फक्त एका तासात; कोस्टल रोडच्या कामाला हिरवा झेंडा | VIDEO

Nitesh Rane : "दिपक केसरकर हमारे साथ..." प्रचारसभेत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, कोकणातल्या राजकारणात खळबळ

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT