Chandrakant Khaire Saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Khaire News : अपात्र ठरणाऱ्या त्‍या आमदारांचे आता १६ दिवस; माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वक्‍तव्‍य

अपात्र ठरणाऱ्या त्‍या आमदारांचे आता १६ दिवस; माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वक्‍तव्‍य

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करून गेलेल्‍यांना क्षमा नाही. मंत्रिमंडळाचा खूप चांगला (Sanbhajinagar) बदल झाला आहे. अपात्र ठरणारे १६ आमदार फक्त आता १६ दिवसांचे राहिलेत. म्हणूनच त्यांचे खाते कमी करून टाकले असल्‍याचे वक्‍तव्‍य शिवसेना (Shiv Sena) नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना राज्‍य सरकारवर निशाणा साधला आहे. खैरे म्‍हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी आता चूप बसून फक्त लोकांची सेवा करावी, अशी त्यांना विनंती करायची आहे. याला पकडा त्याला फोडा; हे बंद करा. लोकांची सेवा करा लोकांना सांभाळून घ्या.

सरकारची उतरती कळा

अर्थमंत्रीपद हे अजित पवारांना मिळेल हे मी आधीच सांगितले होते. या सरकारला आता उतरती कळा लागलेली आहे. सर्व आमदारांना सांभाळता सांभाळता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे वजन सुद्धा कमी होत चालले आहे. देवेंद्र फडणवीस काय खातात त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांना हात जोडून विनंती करतो उरलेल्या दिवसात लोकांची सेवा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra News Live Update : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदेसेना आक्रमक

Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ हादरले! पहाटे ५ वाजता झोपेत असताना कानाला झाला सर्पदंश; 'मण्यार' सापाच्या विळख्याने ११ वर्षाच्या आर्यनचा मृत्यू

MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

SCROLL FOR NEXT