Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : सहा महिन्यात १०६ मुली बेपत्ता; संभाजीनगर शहरातील धक्कादायक चित्र

Sambhajinagar News : महिला- मुलींवर होत असलेले अत्याचाराचे प्रमाण कमी होत नाही. संभाजीनगर शहरात देखील हेच चित्र पाहण्यास मिळत असून शहरातुन बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर आली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबतच्या पोलिसात तक्रारी येत आहेत. मात्र हे प्रमाण कमी होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. गेल्या ६ महिन्यात संभाजीनगर शहरातल्या विविध भागातून तब्बल १०६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.  

महिला- मुलींवर होत असलेले अत्याचाराचे प्रमाण कमी होत नाही. संभाजीनगर (Sambhajinagar) शहरात देखील हेच चित्र पाहण्यास मिळत असून शहरातुन बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यात प्रामुख्याने मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जाते. यातून मुलींना फूस लावून पळविले जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. (Crime News) अशाच काही प्रकारातून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी पाहता पालकांची चिंता वाढली आहे. 

संभाजीनगर शहरामधून तब्बल १०६ मुली बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये १५ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. बेपत्ता झालेल्या एकूण मुलींमधील ८७ मुलींचा शोध (Police) पोलिसांनी घेतला. परंतु अद्याप पर्यंत १९ मुली अजूनही बेपत्ता आहे. १५ ते १७ वयोगटातील मुली सर्वाधिक असून एमआयडीसी वाळूज, सिडको, मुकुंदवाडी आणि पुंडलिक नगर हद्दीतून प्रमाण जास्त असल्याची आकडेवरुन लक्षात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT