Sambhajinagar Farmer End Life Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Sambhajinagar Farmer End Life: संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलीचे शिक्षण कसे होणार या चिंतेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली.

  • अतिवृष्टीमुळे कोबीचं पीक नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.

  • कर्जबाजारीपणा आणि एमबीबीएस शिकणाऱ्या लेकीची फी कशी भरायची या चिंतेत ते होते.

  • मधुकर पळसकर यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक गेलं, डोक्यावर कर्जाचा डोंगर, एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या लेकीची फीस भरायची कशी? यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. बकापूर-पळशी गावातील शेतकऱ्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या बकापूर-पळशी या गावात ही घटना घडली. मधुकर सर्जेराव पळसकर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने गळफास घेत आयु्ष्य संपवलं. संभाजीनगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. मधुकर पळसकर या शेतकऱ्याच्या शेतीचे देखील नुकसान झाले.

मधुकर यांनी मोठ्या कष्टाने शेतात कोबीची लागवड केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाशी आलेली कोबी पीक अतिवृष्टीमुळे सासलेल्या पाण्यात नष्ट झाले. काढलेलं कर्ज कसे फेडायचे आणि हैदराबाद येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या लेकीची फी कशी भरायची? या चिंतेतून मधुकर यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

निसर्गामुळे अगोदरच संकटात असलेल्या पळसकर यांच्या कुटुंबाला मधुकर यांच्या आत्महत्येमुळे मोठा धक्का बसला. घरातल्या कर्त्या पुरुषांने आत्महत्या केल्यामुळे पळसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT