Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime: संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह रील, पोलिसांनी २ तरुणांना ठोकल्या बेड्या

Sambhajinagar Police: छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त रील शेअर करणाऱ्या दोन तरुणांना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली. तर मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली. 'छावा' चित्रपटाचे पोस्टर लावून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारी एक रील या तरुणांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे पोस्टर लावून संभाजीनगरमधील दोन तरुणांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारी रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. जोहेब शोएब पठाण आणि तौफिक अहमद इद्रीस या दोघांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. जोहेब पठाणने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यावरून त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या दोन तरुणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

तर मुंबईमध्ये देखील अशीच घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईमध्ये एका २६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. विक्रोळीमधील पार्कसाईट पोलिसांनी अरबाज खान नावाच्या तरुणाला याप्रकरणी अटक केली. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात या तरुणाने आपत्तीजनक वक्तव्य केले होते. पार्कसाईट पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT