Sambhajinagar News SaamTv
महाराष्ट्र

Crime News : सख्खा भाऊ, पक्का वैरी! किरकोळ वादातून छोट्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी करमाड पोलिस तपास करत आहे.

Saam Tv

दारू पिऊन पत्नीला मारहाण का करतो, म्हणून दोन भावात झालेल्या वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. करमाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत लहान भावाला ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे शुक्रवारी (दि.१३) रोजी दुपारी हा प्रकार घडला. सुनील सुनील भाऊसाहेब पवार (३४, रा. कुंभेफळ, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मयताचे नाव आहे. तर राजू ऊर्फ नंदकुमार पवार (३२, रा. पठार देऊळगाव, ता. बदनापूर) असे आरोपी भावाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत सुनील पवार हा आपल्या पत्नीसह राहत होता. पठार देऊळगाव येथून वर्षभरापूर्वीच तो कुंभेफळ येथे राहण्यास आला होता. तो शेंद्रा एमआयडीसीत कंपनीत कामाला होता. गुरुवारी त्याचा भाऊ राजू ऊर्फ नंदकुमार पवार हा त्याच्या घरी मुक्कामी होता. यावेळी सुनील पवार हा दारूच्या नशेत असताना त्याने त्याच्या पत्नीला मारहाण केली. म्हणून त्याची पत्नी ही गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात सासऱ्याच्या घरी निघून गेली.

या घटनेनंतर दोन्ही भाऊ एकटेच घरी होते. यावेळी त्यांच्या दारू पिऊन वाद झाला. या वादातून राजू याने लाकडी दांड्याने सुनीलला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात डोक्यात जबरी घाव बसल्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला. करमाड पोलिसांना शुक्रवारी (दि.१३) सकाळी याबाबत गुन्हा दाखल करत आरोपी राजू ऊर्फ नंदकुमार पवार याला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT