Fraud  Saam tv
महाराष्ट्र

Fraud : ३५ कोटी घेत क्विक स्टार्ट कंपनीच्या कार्यालयाला कुलूप; आमिषाने दीड हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

Sambhajinagar News : मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन कंपनीत गुंतवणूक केल्यास महिना ३ टक्के परतावा देण्याचे आमिष गांधी व शहाने दाखवले होते. मात्र हजारो लोकांकडून रक्कम जमा करून कंपनीचे मालक चालक पसार

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एक घोटाळा समोर आला आहे. यात गुंतवणुकीवर ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणामुळे संभाजीनगरात गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील जळगाव रोडवर एका इमारतीत गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने आलिशान असे कार्यालय सुरु केले होते. मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन कंपनीत गुंतवणूक केल्यास महिना ३ टक्के परतावा देण्याचे आमिष गांधी व शहाने दाखवले होते. मात्र हजारो लोकांकडून रक्कम जमा करून कंपनीचे मालक चालक पसार झाले आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याबाबत गुंतवणूक करणाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.  

सुरवातीला मिळाला परतावा 

छत्रपती संभाजीनगर शहरात मोक्याच्या तीन ठिकाणी मोठमोठे ऑफिस थाटले होते. सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना त्यांना रक्कम मिळायची. मात्र काही दिवसानंतर परताव्याची रक्कम देण्याचे बंद झाले. पैसे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार घाबरले. त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली. तेव्हा शाखाच बंद असल्याचे आढळून आले. आरोपी शीतल व विठ्ठलने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून संपर्क बंद केला. यामुळे कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावल्याचे समोर आले आहे.

३५ कोटींचा गंडा 

सदरच्या कंपनीने एका वर्षासाठी एक लाख रुपये १० महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल; असे आमिष दाखवून सुमारे दीड हजार गुंतवणूकदाराना ३५ कोटी रुपयांचा गंडा घातला. संभाजीनगरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून निवृत्त झालेले उपअभियंता सरताजसिंग चहल यांना या क्विक स्टार्ट २४ कंपनीने त्यांना २१ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तर निवृत्त शिक्षक नाथाराव काकडे यांना दहा लाखाचा गंडा घातला. विशेष म्हणजे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नोटरी रजिस्ट्री हे गुजरातमध्ये केले गेले.

दोनजण पोलिसांच्या ताब्यात 

शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे.

कंपनी मालकाकडून पोलिसांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य 
गुन्हा दखल झाल्यानंतर क्विक स्टार्ट २४ कंपनीचा मालक मुख्य आरोपी प्रतीक शहाने पोलिसांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात पोलिसांना आर्थिक ज्ञान नसते, कोणीही त्यांच्याकडे गेले तर ते गुन्हा दाखल करून नोटीस देतात. चौकशीला बोलावितात, पण शेवटी गुन्हेगार कोर्ट ठरविते. कोणी पैसे खाऊ घातले तर पोलिसांची भाषा बदलते, असे तो व्हिडिओत म्हणत आहे. या व्हिडिओमुळे आता त्याला अटक होणार की नाही, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT