Sambhajinagar crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar crime : कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर मिरची पावडरचे पाणी टाकत हल्ला; तीन कर्मचारी जखमी VIDEO

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला अबरार निसार शेख याला पकडण्यासाठी पथक घरी गेले. यावेळी शेख याच्या कुटुंबाने एनडीपीएस पथकावर हल्ला केला

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये गुन्हेगाराच्या कुटुंबाचा अँटी ड्रग पोलीस पथकावर लाल मिरची पावडर मिश्रित पाणी फेकत हल्ला केल्याची घटना घडली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली असून यात तीन पोलिस अधिकारी- कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला अबरार निसार शेख याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले होते. यावेळी शेख याच्या कुटुंबाने कारवाईसाठी आलेल्या एनडीपीएस पथकावर हल्ला केला. मिरची पावडर टाकलेल्या पाण्याचा मारा पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर केला. अचानक झालेल्या हल्ल्याने पोलीस देखील चक्रावले होते. मिरचीचे पाणी असल्याने ते पोलिसांच्या डोळ्यात गेले. 

संधीचा फायदा घेत आरोपी झाला पसार  

मिरचीचे पाणी डोळ्यात गेल्याने डोळ्यांची आग होऊ लागली. यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे डोळे पुसून सावरण्यापूर्वीच मुख्य आरोपी अबरार निसार शेख हा पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर देखील शेख याच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी अरेरावी करत घरात जाऊन तपासणी करण्यास विरोध केला. यामुळे परिसरात काही वेळ गोंधळ व तणावाचे वातावरण होते.  

पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात 

दरम्यान शेख याच्या कुटुंबातील हल्ला करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात अस्मा शेख हारुण, नजिया शेख अबरार, मिजबा शेख हारुण, प्रवीण शेख अबरार, सायमा शेख हारुण आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तसेच ड्रग विकत असल्या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

चिनी लोकांचे डोळे लहान का असतात? कारण एकालाही माहित नाही

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

SCROLL FOR NEXT