Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : घरात घुसून माय-लेकींना मारहाण; संभाजीनगरात किरकोळ वाद विकोपाला

Sambhajinagar News : आईला मारहाण होत असल्याचे बघून मुलीने आरोपींना भिडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी तिलाही धक्काबुक्की केली. यात महिला जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : अगदी किरकोळ वादातून टोकाची भूमिका घेत जीव घेतला जात असतो. तर कधी जीवघेणा हल्ला चढविला जात असतो. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील अयोध्यानगरात घडला आहे. किरकोळ कारणावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडी लावण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरात सदरची घटना घडली आहे. रोहन आदिक नावाच्या संशयित आरोपीने मित्रांना बोलावून थेट महिलेच्या घरात घुसून मारहाण केली आहे. दरम्यान आईला मारहाण होत असल्याचे बघून मुलीने आरोपींना भिडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी तिलाही धक्काबुक्की केली. यात यात महिला जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष 

सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. घटना घडल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत महिलेने तक्रार दिली. मात्र पोलीस आमच्या ओळखीचे आहेत काही होणार नाही; अशी धमकी देखील आरोपीने दिली. तर पोलिसांनी देखील या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेत आरोपीला मोकाट सोडल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

मुलांचा वेष घेऊन ट्रकचालकांची केली लूट

नाशिकमध्ये दोन तरुणींनी मुलांचा वेष घेऊन ट्रकचालकांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रक चालकांना लुटण्यासाठी दोन्ही तरुणींनी केस कापून मुलांसारखा पेहराव केला होता. त्यांनी रामनिवास वर्मा या ट्रक चालकाला मारहाण करून ८ हजार रुपये लुटले. तर ट्रक चालकाने ११२ क्रमांकावर फोन करत पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही तरुणींना अटक केली असून तीन साथीदार फरार झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT