FATHER KILLS DISABLED SON IN CHHATRAPATI SAMBHAJINAGAR SHOCKING CRIME Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : माणुसकीला काळिमा! ५ वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या, आई वडील फरार; धक्कादायक कारण समोर

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरात पाच वर्षीय दिव्यांग मुलाची वडिलांकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी आई-वडील फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

  • छत्रपती संभाजीनगरात पाच वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या

  • वडिलांवर हत्येचा संशय; आई-वडील फरार

  • गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

  • घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि सुरक्षेची मागणी

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्दयी हत्या करण्यात आली. संतापजनक म्हणजे या अमानुष कृत्यामागे स्वतः जन्मदाता बाप असल्याच उघड झालं आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून आरोपी आई वडील फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे आईवडील रोजगारासाठी आठ दिवसांपूर्वी शहरात आले होते. आर्थिक अडचणी आणि मुलाच्या अपंगत्वामुळे दोघेही त्रस्त झाले होते. या सगळ्याला कंटाळलेल्या जन्मदात्यांनी अपंग मुलाची निर्दयी हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मुलाचा मृतदेह हरसुल सावंगी बायपास परिसरातील एका शेतात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक पुराव्यांनुसार, मुलाचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. शवविच्छेदन अहवालातही मुलाच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वीही मुलाच्या हातात खाऊचे पाकीट असल्याची बाब समोर आली असून या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.

घटनेनंतर आरोपी आई-वडील फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहितीदार आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने आरोपींचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून दिव्यांग मुलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

Palghar Crime: जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT