Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : धोकादायक इमारती मनपा करणार सील; पावसाळ्याच्या अनुषंगाने पाऊल

Sambhajinagar News : दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरात धोकेदायक ठरणाऱ्या इमारतींचे ऑडिट केले जात असते. त्यानुसार मालकांना नोटीस बजावून इमारत खाली करण्याबाबत सूचना दिल्या जातात

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात जुन्या धोकादायक इमारती पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दृष्टीने महापालिकेकडून दरवर्षी धोकेदायक असलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली जाते. मात्र यंदा छत्रपती संभाजीनगर शहरातील धोकादायक इमारती तातडीने सील करण्यात येणार आहेत. 

दरवर्षी पावसाळा (Rain) सुरु होण्यापूर्वी शहरात धोकेदायक ठरणाऱ्या इमारतींचे ऑडिट केले जात असते. त्यानुसार मालकांना नोटीस बजावून इमारत खाली करण्याबाबत सूचना दिल्या जातात. हि प्रक्रिया दरवर्षीची असून यंदा देखील शहरात महापालिकेकडून पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने शोधलेल्या अति धोकादायक इमारती पाडण्यात याव्या. त्याला विरोध झाल्यास तातडीने या इमारती सील कराव्यात; असा इशारा पालिकेने दिला आहे. तशा सूचना महापालिका (Sambhajinagar) प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

नाल्यांवर बसविणार जाळ्या 

त्याबरोबरच नालेसफाईची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करावीत आणि बुडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी नाल्यांना जाळ्या लावाव्यात; अशाही सूचना पालिका प्रशासनाने केल्या. तीन दिवसांपूर्वी शहरात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर मनपाने सतर्कता म्हणून शहरातील नाल्यात कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जाळ्या बसवण्याची सूचना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

SCROLL FOR NEXT