महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : ४ हजार २०० मालमत्ताधारकांनी लावून घेतला कर; १ एप्रिलपासून वाढीव कर आकारणीची भीती

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील नव्या व अद्याप कर आकारणी न झालेले मालमत्ताधारक आतापर्यंत कर आकारणी झाली नसतानाही बिनधास्त राहत होते.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील नव्या व अद्याप कर आकारणी न झालेल्या मालमत्तांनी पुढे येत (Sambhajinagar) मालमत्तेला कर आकारणी करून घेतली आहे. महापालिका हद्दीतील सुमारे ४ हजार २०० मालमत्ताधारकांनी दुप्पट कर आकारणीच्या भीतीने कर आकारणी करून घेतली आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील नव्या व अद्याप कर आकारणी न झालेले मालमत्ताधारक आतापर्यंत कर (Tax) आकारणी झाली नसतानाही बिनधास्त राहत होते. मात्र अशा मालमत्तांना १ एप्रिलपासून वाढीव दराने म्हणजे दुप्पट दराने कर लागणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रीकांत यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयानंतर नवीन आर्थिक वर्षात दुप्पटीने कर आकारणी लागण्याच्या भीतीने मालमत्ता धारक स्वतःहून कर लावून घेण्यासाठी पुढे आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिनाभरात जवळपास ४ हजार २०० मालमत्ता धारकांनी आपाल्या घरासह दुकानांना कर आकारणी करून घेतल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान महापालिका प्रशासनाने नवीन आर्थिक वर्षातील कर आकारणीचे धोरण २० फेब्रुवारीपर्यंत ठरवणे आवश्यक असते. मात्र मागील बारा वर्षापासून महापालिकेने मालमत्ता करामध्ये कुठल्याच प्रकारची वाढ केलेली नाही. हा प्रकार आयुक्तांच्या लक्षात आला; तेव्हा त्यांनी अद्याप कर आकारणी न झालेल्या जुन्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपर्यंत कर लावून घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT