Sambhajinagar crime news today Saam TV
महाराष्ट्र

२ तासांपूर्वी मित्रांसोबत फोटो काढला, स्टेटसला ठेवला; पण त्यांनीच केली हत्या, संभाजीनगरात खळबळ

Sambhajinagar crime news : संभाजीनगरमध्ये मित्रांसोबत फोटो स्टेटस ठेवल्यानंतर अवघ्या दोन तासांत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

Namdeo Kumbhar

माधव सावरगावे, संभाजीनगर प्रतिनिधी

Sambhajinagar crime news today : मित्रांसोबत २ तासांपूर्वी हसून-खेळत फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवले. पण त्याच मित्रांनी घात केला. मित्रांसोबतच्या फोटोचे स्टेटस ठेवल्यानंतर अवघ्या दोन तासांत एका तरुणाचा निर्घून खून केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल मैदानावर ही घटना घडली. रोहित उर्फ करण रवी म्हस्के असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत रोहित म्हस्के हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. काही महिन्यांपूर्वी त्याचे त्याच्याच काही मित्रांसोबत खटके उडाले होते. मंगळवारी रात्री या मित्रांनी रोहितला सोबत घेतले, गप्पा मारल्या आणि एकत्र फोटोही काढले. रोहितने मोठ्या विश्वासाने या मित्रांसोबतचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टेटस म्हणून ठेवला. मात्र, हे स्टेटस ठेवल्यानंतर अवघ्या दोन तासांतच जुन्या वादाचा वचपा काढत संशयित आरोपींनी रोहितवर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली.

पुंडलिकनगर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने चक्रे फिरवत कृष्णा उदावंत, सागर घुले, बादशहा शेख, प्रफुल्ल पाखरे आणि शोएब शेख या पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील सहावा आरोपी अक्षय पडूळ हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ज्या पुंडलिकनगर परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती, तिथेच आता ही हत्येची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT