Sambhajinagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident : चहा प्यायला जाणं बेतलं जीवावर; बसच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

Sambhajinagar News : कन्नड शहरातील पोलीस कॉलनी परिसरात राहणारे ओम श्रावण तायडे आणि आदिनाथ शेखर रहिंज हे दोघे मित्र एका मोपेड दुचाकीने दुपारच्या सुमारास आपल्या मित्राकडे चहा घेण्यासाठी जात होते.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 
छत्रपती
संभाजीनगर : मित्राने बोलावल्यानेअंधानेरकडे मित्राच्या घरी चहा पिण्यासाठी जाणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला. दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कन्नड घाटातील रस्त्यावर घडला आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) कन्नड शहरातील मधुर डेअरीसमोर एसटी बस आणि दुचाकींचा हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आदिनाथ राहीज आणि ओम तायडे अशी मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. कन्नड शहरातील पोलीस कॉलनी परिसरात राहणारे ओम श्रावण तायडे आणि आदिनाथ शेखर रहिंज हे दोघे मित्र एका मोपेड दुचाकीने दुपारच्या सुमारास आपल्या मित्राकडे चहा घेण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांचा एसटी बस सोबत समोरासमोर (Accident) अपघात झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

आदिनाथ व ओम हे दोघेही पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं आहेत. यातील आदित्य हा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल शेखर रहींज यांचा मुलगा, तर ओम हा सहाय्यक फौजदार श्रावण तायडे यांचा मुलगा होता. मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एकाच ठिकाणी सोबत राहणाऱ्या दोन्ही मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT