Sambhajinagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident : मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक उलटला; ८० ते ९० मेंढ्यांचा मृत्यू

Sambhajinagar News : राजस्थान येथून मेंढ्या घेऊन जाणारा हा ट्रक हैदराबाद येथे जात होता. ट्रक वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात आला असताना अपघात झाला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मेंढ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मालेगाव महामार्गावरील वैजापूर तालुक्यात तलवाडा घाटात घडली. घाट रस्त्यात ट्रक उलटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ८० ते ९० मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. 

राजस्थान येथून मेंढ्या घेऊन जाणारा हा ट्रक हैदराबाद येथे जात होता. ट्रक वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात आला असताना अपघात (Accident) झाला. रात्री पाऊस सुरू असल्याने वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यात मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला. 

लाखोंचे नुकसान 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात पाऊस सुरु आहे. पावसामुळे रस्त्याचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातात मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढी मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही मेंढ्या मात्र बचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT