Sambhajinagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident : भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; दुचाकीला धडक देत बसने नेले फरफटत, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरेगाव येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सुचला जोरदार धडक दिली. या अपघातग्रस्त दुचाकीवरून तीन महाविद्यालयीन तरुण जात होते.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या (Accident) अपघातात बसने दुचाकीला धडक देत १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Sambhajinagar) ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरेगाव येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सुचला जोरदार धडक दिली. या अपघातग्रस्त दुचाकीवरून तिघेही न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगाव येथे बारावीत शिक्षण घेत होते. कॉलेज सुटल्यानंतर तिघे एकाच दुचाकीने ढोरेगाव रोड क्रॉस करत होते. अचानक मध्यभागी आले असता छत्रपती संभाजीनगरवरून फलटणच्या दिशेने निघालेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन विद्यार्थी दूर फेकले गेले. तर एक बसच्या खाली दुचाकीसह तब्बल १०० फूट अंतरापर्यंत फरपटत गेला. यात किरण दत्तात्रेय काजळे  (रा. आनंदवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

संभाजीनगर जिल्ह्यातील ढोरेगाव येथे झालेल्या या अपघाताचे थरारक दृश्य रस्त्यावरील दुकानात लावण्यात आलेल्या (CCTV) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात गौरव संतोष मिसाळ आणि गौरव संजय सुगदान (दोन्ही रा. भोयगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यानं पुढील छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT