sambhaji patil nilangekar vs abhay salunkhe, Nilanga Vidhan Sabha Exit Poll 2024 sambhaji patil nilangekar vs abhay salunkhe, Nilanga Vidhan Sabha Exit Poll 2024
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam TV Exit Poll : काँग्रेस आणि भाजपच्या पारंपारिक लढतीत, कुणाचा विजय होणार? एक्झिट पोलच्या आकड्यानुसार, लोकांचा कल समोर आलाय.

Namdeo Kumbhar

sambhaji patil nilangekar vs abhay salunkhe, Nilanga Vidhan Sabha Exit Poll 2024 : निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर आणि अभय साळुंखे यांच्यामध्ये थेट लढत झाली. २० नोव्हेंबर रोजी मतदारांनी आपला कौल मतपेटीत बंद केला. आता शनिवारी राज्यात काय होणार, हे स्पष्ट होणार आहे. पण त्याआधीच एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. निलंगामध्ये भाजप उमेदवाराचे पारडे जड दिसत आहे.

लातूरमधील निलंगामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट सामना झालाय. निलंगेच्या जनतेने आपला कौल भाजपच्या पारड्यात दिल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यातून दिसतेय. निलंग्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये पारंपारिक लढत पार पडली. एक्झिट पोलनुसार, हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यता आहे. संभाजी पाटील निलंगेकर आणि अभय साळुंखे यांच्यातील लढतीकडे लातूरचे लक्ष लागलेय.

अभयकुमार साळुकें यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. संभाजी पाटील निलंगेकर तिसऱ्यांदा आमदार होण्याची शक्यता आहे. निलंग्यामध्ये मराठा समजाच्या मताचा मोठा फरक फडला.

निलंग्यातील देशमुख विरुद्ध निलंगे ही पारंपारिक लढतीकडे लातूरचं लक्ष लागले. अशोक पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे दोन टर्मच्या उमेदवाराचे तिकीट कापल्यामुळे एक गट नाराज होता, याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. संभाजीपाटील निलंगेकर यांचा मोठा विजय होईल, असे बोलले जात आहे.

मनोज जरांगेंनी भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे सर्वाधिक मराठा उमेदवार देऊन भाजपने जरांगे फॅक्टरवर घाव घातलाय. मात्र भाजपच्या मराठा खेळीने जरांगे फॅक्टर निष्प्रभ होणार का? आणि मराठा समाजाला झुकतं माप दिल्यास इतर समाजाची नाराजी भोवणार का? याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smita Gondkar Photos: 'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज, फोटो पाहून नजर भिरभिरेल

भाजपात पक्ष प्रवेशाचा धडाका; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हाती कमळ

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजप–RSSचा कट; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Gajar Halwa Recipe: कडाक्याच्या थंडीत बनवा गाजराचा गरमागरम हलवा, लगेच लिहून घ्या रेसिपी

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर खड्डयांमुळे झालेल्या अपघातात तीन कार एकमेकांवर धडकल्या

SCROLL FOR NEXT