Chhatrapati sambhaji nagar News  Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: धाराशिव-छत्रपती संभाजीनगर नामांतराचा वाद पुन्हा कोर्टात; 'या' दिवशी होणार सुनावणी

Chhatrapati Sambhaji Nagar: सरकारने दोन्ही जिल्ह्याच्या नामांतराचा अध्यादेश काढल्यानंतरही काही लोकांनी आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली आहे.

Vishal Gangurde

बालाजी सुरवसे

Chhatrpati Sambhajinagar Latest News:

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीवच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा कोर्टात पोहचला आहे. राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराचा अध्यादेश काढला होता. सरकारने दोन्ही जिल्ह्याच्या नामांतराचा अध्यादेश काढल्यानंतरही काही लोकांनी आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टात दाखल केलेल्या या याचिकेवर २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

राज्य सरकारने मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या पूर्वसंध्येला धाराशिव व छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने नामकरणाचं राजपत्र देखील प्रसिद्ध केलं होतं. सरकारच्या याबाबतच्या अधिसूचनेला आवाहन देणाऱ्या याचिका न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायाधीश अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केल्या आहेत.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात या आधी देखील उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा न्यायालयाच्या अंतिम सुनावणीपर्यंत राज्य सरकार दुसरी नावे वापरणार नाही अशी आशा कोर्टाने व्यक्त केली होती.

मात्र, कोर्टाने आशा व्यक्त केल्यानंतर औरंगाबादसाठी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT