Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: शेतकऱ्याने ट्रॅक्टरने रोखला समृद्धी महामार्ग; महामार्गावरील पाणी शेतात गेल्‍याने कांद्याचे नुकसान

शेतकऱ्याने ट्रॅक्टर आडवे करून रोखला समृद्धी महामार्ग; महामार्गावरील पाणी शेतात गेल्‍याने कांद्याचे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : जोरदार पावसामुळे महामार्गावर साठलेले पाणी शेतामध्ये वाहून गेले. या पाण्यामुळे शेतकऱ्याचे (Farmer) पाचशे क्विंटलहून अधिक कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) ट्रॅक्टर आडवा लावून आपला रोष व्यक्त केला. (Tajya Batmya)

समृद्धी महामार्गाचे काम लवकर करण्याच्या घाईत नाल्यांचे काम अर्धवट राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात ही घटना घडली. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्‍याजवळ असलेल्या गट नंबर ३१ मधील शेतकरी सुनील भोसले, जनार्दन भोसले, पोपट भोसले, दीपक भोसले व गट नंबर ५० मधील देविदास साठे, राजेंद्र साठे यांच्या शेतात हे पाणी शिरले होते. यामुळे शेतातील (Onion) कांद्याचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी मध्‍यस्‍थी करत दिले आश्‍वासन

शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर आडवे लावून समृद्धी महामार्ग रोखला होता. यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत काढली. तसेच समृद्धी महामार्गावर येणारे पाणी आता शेतात येणार नाही असे आश्वासन त्याला दिले. यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर बाजूला करत मार्ग मोकळा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

SCROLL FOR NEXT