Sambhaji Bhide Controversial Statement On Mahatma Gandhi: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी महिलांच्या टिकलीवरुन, कोरोनावरुन तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी तिरंगा झेंडा आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादात सापडले होते. आता संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने कॉंग्रेसने संताप व्यक्त केला आहे...
महात्मा गांधींबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य....
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीत कार्यक्रमात बोलताना महात्मा गांधी यांच्याबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. "महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत.." असे ते म्हणाले.
काय म्हणाले संभाजी भिडे?
"मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत.." असे म्हणत याबाबत पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला.
कॉंग्रेस आक्रमक...
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. "राष्ट्रपिता महात्मा गांधीची अवमानना करणाऱ्या मनोहर भिडेवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तिरंग्याचा, स्वातंत्र्यदिनाचा व आता राष्ट्रपित्याचा अवमान हे देशविरोधी कृत्य आहेत. पंतप्रधानांनी गुरु म्हटल्यानेच सरकार पाठीशी घालत आहे का?" असा सवाल कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला... (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.