Sambhaji Bhide Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide: आमदार खासदारच लोकशाहीला कलंक; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान

संभाजी भिडे यांनी आमदार, खासदार आणि लोक प्रतिनिधी हे लोकशाहीला कलंक असल्याची जहरी टीका केली आहे.

विजय पाटील

सांगली - गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली. नवरात्रच्या काळात दुर्गामाता दौडीच आयोजन करण्यात येते. हजारो धारकरी दौडीत सहभागी झाले होते. यावेळी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आमदार, खासदार आणि लोक प्रतिनिधी हे लोकशाहीला कलंक असल्याची जहरी टीका केली आहे. (Maharashtra News)

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शना खाली गेली 35 वर्ष दुर्गामाता दौडीच आयोजन केले जाते. यावेळी सांगली शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनामुळे गेली दोन वर्षे रद्द झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीला यंदा उत्साही वातावरणात सुरवात झाली. सांगलीत नवरात्रीमधे घटस्थापने पासून ते दसरा पर्यंत दुर्गामाता दौड सांगलीतील भागाभागातून धर्म जागृती करत काढली जाते. नऊ दिवस दुर्गामाता दौड सुरू होती असून दसऱ्यादिवशी आज दौडीचे सांगता करण्यात आली.

आपल्या मातृभूमी साठी जगणारी माणसं पाहिजेत पण तेथेच बोंब आहे. आपले आमदार खासदार यांना लोक निवडून देतात पण यांना शरम वाटत नाही भाडोत्री, बेकार, कलंक आहेत हे लोकशाहीला आणि परंपरेला अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; पक्षात मोठी खळबळ

Shocking : मिस कॉलनं सुरू झाली लव्हस्टोरी; ५ मुलांच्या आईने थेट १९ वर्षांच्या तरुणासोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT