sambhaji bhide controversy on shivrajyabhishek din saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide : शिवराज्याभिषेक सोहळा बंद होणार? ६ जूनच्या शिवराज्यभिषेकाचं संभाजी भिडेनां वावडं?

Sambhaji Bhide Shivrajyabhishek Din : संभाजी भिडेंनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या दिनावरच आक्षेप घेतलाय. नेमकी त्यांनी अशी कोणती मागणी केली की ज्यामुळे पुन्हा राज्यात वादाला सुरुवात झाली पाहूया..

Snehil Shivaji

राज्यात कधी कोणता वाद सुरु होईल याचं कधीच काही सांगता येत नाही. आणि त्यात संभाजी भिडे बोलतील आणि वाद होणार नाही हे तर निव्वळ अशक्यच. आता तर संभाजी भिडेंनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकालाच विरोध केलाय. शिवप्रतिष्ठान हिंदूस्तान संघटनेच्या संभाजी भिडेंनी नेमकी काय मागणी केलीये पाहूया.

तिथीप्रमाणेच महाराजांचा राज्यभिषेक दिन साजरा करा अशी मागणी संभाजी भिडेंनी केल्यामुळे आता मात्र राज्यातील वातावरण तापलंय. संभाजी भिडेंच्या या वक्तव्याविरोधात कधी नव्हे ते दोन्ही राष्ट्रवादीचं एकमत झाल्याचं पहायला मिळालं. तर संभाजी भिडेंनी 6 जूनचा राज्याभिषेक बरखास्त करण्याची मागणी केल्यानं संभाजी ब्रिगेडनं थेट भिडेचं तोंड काळं करण्याची जाहीर धमकी दिलीये.

संभाजी भिडेंनी केवळ 6 जूनच्या शिवराज्यभिषेकालाच विरोध केलेला नाही तर त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचं समर्थन ही केलंय. यावेळी त्यांनी वाघ्या कुत्र्याची इतिहासात नोंद नाही असा दावा करणाऱ्या इतिहासकारांच्या अभ्यासावर शंका व्यक्त केलीये.

आतापर्यंत महापुरुषांच्या जन्मदिनाचे वाद ऐकिवात होते पण भिडेंच्या वक्तव्यानं महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचा नवा वाद आता सुरु झालाय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचं भूषण त्यामुळे महाराष्ट्रात आलेला प्रत्येक दिवस हा केवळ शिवशाहीचाच. त्यामुळे कोण्या एका दिवसात इतक्या महान राजाच्या राज्याभिषेकाला मर्यादित ठेवणं हेच महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Encounter : आतापर्यंतचा सर्वात मोठा एन्काउंटर, ६४ गुन्हेगारांचा खात्मा, स्पेशल फोर्सची मोठी कारवाई

November Travel: नोव्हेंबरमध्ये ट्रॅव्हल प्लॅन करताय? फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत 'या' सुंदर रोमँटिक ठिकाणी करा ट्रिप

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

दोन आलिशान वाहनांची एकमेकांना टक्कर, बिझनेसमॅन, पत्नी अन् मुलीचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

Nilesh Ghaiwal: गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; अटकेसाठी हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT