Kolhapur, Shri Mahalaxmi - Ambabai Temple, Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात संभाजी ब्रिगेडने छेडलं आंदाेलन

प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संभाजी ब्रिगेडने छेडलं आंदाेलन.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या दानपेटी शेजारीच खाजगी पुजारी बेकायदेशीर दानपेटी (दानपात्र) लावत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने आज (साेमवार) संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या परिसरात दान पत्र लावण्यात येणार आहे. (Maharashtra News)

या दानपात्रात जमा होणारी रक्कम ही गोरगरीब जनतेसाठी खर्च करण्यात येणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली. आज अंबाबाई मंदिर परिसरात दानपत्र आंदोलन (aandolan) करण्यात येत आहे.

आंदाेलकांची घाेषणाबाजी

महाद्वार परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाद्वार परिसरात या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. हे आंदोलन करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

निलेश सुतार (संभाजी ब्रिगेड) म्हणाले कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या दानपेटी शेजारीच खाजगी पुजारी बेकायदेशीर दानपेटी (दानपात्र) लावत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या.

प्रशासनाचे दुर्लक्ष

त्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही गेले अनेक दिवसांपासून मागणी करीत आहाेत परंतु त्याकडे (kolhapur) प्रशासनाने दुर्लक्ष केले. दरम्यान आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या परिसरात दान पत्र लावून दानपात्रात जमा होणारी रक्कम ही गोरगरीब जनतेसाठी खर्च करण्यात येणार आहे असे सुतार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT