vitthal rukmini pandharpur, Vitthal Rukmini mandir News, Pandharpur latest Marathi news
vitthal rukmini pandharpur, Vitthal Rukmini mandir News, Pandharpur latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

विठुरायाच्या लाडू प्रसादाची विक्री सुरू; दोन वर्षांनंतर भाविकांना मिळाला प्रसाद

भारत नागणे

पंढरपूर - कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांपासून बंद असलेला विठुरायाच्या लाडू प्रसादाची आता विक्री सुरू झाली आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लाडू विक्रीचा प्रारंभ करण्यात आला‌. तब्बल दोन वर्षांनंतर भाविकांना लाडू प्रसादाचा आस्वाद घेता आला.

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणत भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी मंदीर समितीच्या वतीने लाडू प्रसाद विक्री केली जाते. मात्र, कोरोनामुळे मागील दोन‌ वर्षांपासून लाडू प्रसादाची विक्री बंद होती.

हे देखील पाहा -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिर सुरु झाले. पण लाडू प्रसादाची विक्री बंद होती. लाडू प्रसादाची विक्री सुरू करावी‌ अशी मागणी भाविकांनी‌ केली होती. त्यानंतर मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या तोंडावर लाडू विक्री सुरू केली आहे.

नाशिक येथील यशोधरा महिला सहकारी औद्योगिक सहकारी संस्थेला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. आषाढीसाठी सुमारे आठ लाख बुंदी लाडू तर तीन लाख राजगिरा लाडू तयार करण्यात येणार आहेत. लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.140 ग्रॅम वजनाचा बुंदी लाडू प्रसाद 20 रुपये तर 50 ग्रॅम वजनाचा राजगिरा लाडू प्रसाद 10 रूपयांना मिळणार आहे. दोन वर्षांनंतर भाविकांना‌ लाडू प्रसाद मिळू लागल्याने आता समाधान व्यक्त केले जात आहे. ‌

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT