कल्याण महात्मा फुले पोलिसांची कारवाई; सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या

लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Crime News In Marathi
Crime News In MarathiSaam Tv

मुंबई - मुंब्रा परिसरातून मोटारसायकल चोरी करून कल्याण डोंबिवली मध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्याना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात .रिजवान शेख व महंमद कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या आरोपीवर कल्याण डोंबिवली (Dombivli) सह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी (Police) या आरोपीकडून १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चार मोटारसायकल अश्या प्रकारे ६ लाख ९० हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत पुढील तपास सुरू केला आहे.

हे देखील पाहा -

कल्याण मध्ये एका वृध्द महिलेची पहाटे मॉर्निंग वॉक करत असताना दोन दुचाकी चोरट्यांनी धूम स्टाईलने चैन चोरली होती .या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलीस तपास सुरू होता .परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व खबऱ्याकदून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आठ दिवसात रिजवान शेख व महंमद कुरेशी नावाच्या दोन सराईत चोरट्याना मुंब्रा येथे सापळा रचून अटक केली .तपासादरम्यान दोघे सराईत चोरटे असल्याचे समोर आले.

या दोघा विरोधात कल्याण डोंबिवली सह ठाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात १७ गुन्हे दाखल असून आता पर्यंत त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात ५, बाजारपेठ पोलीस ठाण्यात २, मुंब्रा मालवण व वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ असे एकूण दहा गुन्ह्याची कबुली दिली. पकडले जावू नये म्हणून हे दोघे चोरटे चैन स्नेचींग करण्यासाठी बाईक चोरी करायचे आणि त्याच चोरी केलेल्या बाईक वर चैन स्नेचिंग करायचे.

Crime News In Marathi
नंदुरबार, गुजरातकडे अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त

केक शॉपमध्ये चोरी करणारा चोरटा गजाआड

केक शॉपमध्ये केक घेण्याच्या बहाण्याने आलेल्या एका तरुणाने दुकानातील ३० हजरांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती .या प्रकरणी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास करत महात्मा फुले पोलिसांनी मंदार जैसवाल या चोरट्याला अटक केली आहे. चोरीस गेलेली रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com