bams female doctor sexually assaulted in pimpari chinchwad  saam tv
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड हादरलं! लग्नाचं आमिष दाखवून सेल्स मॅनेजरने महिला डॉक्टरवर केला बलात्कार

पिंपरी-चिंचवड शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.. एका सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर (BAMS Doctor) बलात्कार केल्याची घटना घडलीय. नराधम (sales manager) सेल्स मॅनेजरने पीडित महिलेला एका सदनिकेत कोंडून ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेला लग्नाचं आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिला डॉक्टरने आरोपी विरोधात पिंपरी पोलीस (Pimpari Police) ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अंजिम नूर मोहम्मद तांबोळी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पिंपरी चिंचवड शहरात एका सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचं आश्वासन देऊन सेल्स मॅनेजरने पीडित महिला डॉक्टरवर बलात्कार केला.

सन २०१९ पासून ते २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत संत तुकाराम नगर येथील एका घरामध्ये आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार करू नये म्हणून पीडित महिला डॉक्टरला आरोपीने एका सदनिकेत कोंडून ठेवलं. या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेत पिंपरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT