बोगस कागदपत्राद्वारे जमिनीची विक्री; जालन्यातील धक्कादायक प्रकार Saam Tv
महाराष्ट्र

बोगस कागदपत्राद्वारे जमिनीची विक्री; जालन्यातील धक्कादायक प्रकार

१९८७ साली प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना - शहराच्या बायपाससाठी संपादित केलेल्या जमिनीची नोंद महाराष्ट्र Maharashtra शासनाच्या नावाने सातबाऱ्यावर झाली नसल्याने, त्या जमिनीचे बोगस पी.आर.कार्ड P R Card तयार करून जमिनीची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात Jalna समोर आला आहे.

नाशिक ते निर्मळ,सोलापूर ते मलकापूर हे प्रमुख महामार्ग जालना शहरातून जात असल्याने त्यांना शहरा बाहेरून बायपास रस्ता करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १९८७ साली प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

यात अंबड चौफुली,मंठा चौफुली,सिंदखेड राजा चौफुली, देऊळगाव राजा चौफुली,भोकरदन चौफुली,औरंगाबाद चौफुली ते अंबड चौफुली आशा पद्धतीने शहराच्या चोही बाजने  जाणाऱ्या ह्या बायपासला मान्यता ही मिळाली, त्यासाठी २६ गटातील ४० हेक्टर जमीन संपादन करून त्यांचा मोबदला जमीन मालकांना देण्यात आला.

हे देखील पहा -

संपादित केलेल्या जमिनीवर बायपास तयार करून त्यावर डांबरीकरण ही करण्यात आले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारच्या विशेष योजनेच्या माध्यमातून हा संपूर्ण बायपास चौपदरी करून सिमेंट काँक्रीट करण्यात आला. या बायपाला दोन्ही बाजूने सब रस्ता ही करण्यात आला मात्र हा चक्क सब रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्य शासनाच्या मालकीच्या या 40 हेक्टर जमिनीच्या सातबाऱ्यावर आज ही मुळ मालकांचे नाव आज ही कायम असल्याने, या संपादित जमिनीची शासन दरबारी नोंदच झाली नसल्याने. जमीन मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून चक्का अकृषक परवाने काढून भूखंडाची विक्री व बक्षिसपत्राच्या आधारे हस्तांतरित करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.

भू माफिया या जमिनीची परस्पर विक्री करत असल्याने मोबदला मिळालेल्या या जमिनी शासनाच्या नावे करा अशी मागणी मूळ जमीन मालकांनी केली आहे. जमीन संपादन करून मूळ मालकांना १९९३ मध्ये मोबदला मिळून इतके वर्ष झाली मात्र आध्याप ही या जमिनी मूळ मालकाच्या नावे कशा? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT