ST STRIKE: आज एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार  Saam Tv
महाराष्ट्र

ST STRIKE: आज एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज एसटी कर्मचाऱ्यांच्या (st employees) खात्यामध्ये आज पगार जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या वेतनवाढीप्रमाणे हा पगार जमा होणार आहे. ठरल्याप्रमाणे पगारवाढ आज खात्यामध्ये जमा केले जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान मेस्मा संदर्भामध्ये आज कोणतीही बैठक नाही. मेस्माविषयी निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पगारवाढीच्या घोषणेनंतर सरकार प्रत्यक्षात खात्यामध्ये किती रक्कम जमा करणार याकडे आंदोलनातील इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यामध्ये 19 हजार एसटी कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले आहेत. आज कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. मात्र स्वारगेट डेपोमधील एकही कर्मचारी अजून कामावर परतलेला नाही. खाजगी आणि शिवशाही बसेसच्या माध्यमातून सध्या वाहतूक सुरू आहे. लालपरी अजूनही डेपोमध्येच आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनानुसार पगार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे डय़ुटीवर हजर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर पगार जमा होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT