बार्शीची साक्षी इंगोले मागच्या 20 दिवसांपासून गायब; चित्रा वाघ यांचा प्रशासनाला सवाल! SaamTvNews
महाराष्ट्र

बार्शीची साक्षी इंगोले मागच्या 20 दिवसांपासून गायब; चित्रा वाघ यांचा प्रशासनाला सवाल!

जिल्ह्यातील बार्शीची साक्षी इंगोले ही मुलगी मागील 20 दिवसांपासून बेपत्ता आहे. बार्शीतील सिल्व्हर ज्यूबली शाळेत साक्षी ही इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्ट्रामध्ये सध्या तरुण मुलींचं अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शीची साक्षी इंगोले ही मुलगी मागील 20 दिवसांपासून बेपत्ता आहे. बार्शीतील सिल्व्हर ज्यूबली शाळेत साक्षी ही इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे.

याबाबत गणेश भोकरे या इसमा विरोधात मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून बार्शी (Barshi) पोलिसात आयपीसी कलम 154 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. संबंधित इसमाने फूस लावून आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आई - वडिलांनी व्यक्त केला आहे.

सदरील घटनेला 20 दिवस ओलांडून गेले असले तरी मुलीचे आई - वडील अजून ही मुलीच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून हे प्रकरण प्रकाशात आणलं आहे. यामध्यमातून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला धारेवर धरलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला करा विशेष उपाय; संकटं, अडथळे, पैशांची तंगी, अडचणी होतील दूर

Homemade Facepack: नॅचरल ग्लोसाठी आठवड्यातून २ वेळा हा खास होममेड फेसपॅक नक्की लावा

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठी दुर्घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

SCROLL FOR NEXT