Sakal Saam Survey Saam Tv
महाराष्ट्र

Sakal Saam Survey: वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा पायंडा मान्य आहे का? सर्व्हेत मतदारांनी मांडलं रोखठोक मत

वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा पायंडा मान्य आहे का? सर्व्हेत मतदारांनी मांडलं रोखठोक मत

Satish Kengar

Sakal Saam Survey: दोन आठवड्यापूर्वीच राष्ट्रवादीत मोठी फूट पडून  अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ भेटली. या सगळ्या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे नव्याने आखली गेली आहेत. यातच सत्तेतील मित्र पक्षाने कुरबुरी करत का होईना हा नवीन संसार स्वीकारला आहे.

मात्र राज्यातील मतदारांना तसं वाटतंय का? त्यांचा कल काय आहे? या नवीन घडामोडीनंतर राज्यात नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. यामध्ये मतदार या सगळ्याकडे कसा बघतोय, आपली फसवणूक झाल्याची भावना मतदारांच्या मनात आहे का? याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही न्यूज यांनी राष्ट्रवादी Next 'महासर्वेक्षण' (Sakal-Saam Survekshan) केलं आहे.

कसं करण्यात आलं सर्वेक्षण?

हे सर्वेक्षण राज्यातील सगळ्या मतदार संघात करण्यात आला आहे. यामध्ये सगळ्या लिंगाचे म्हणजे स्त्री-पुरुष आणि सगळ्या वयोगटातील मतदारांचा समावेश आहे. यात राज्यातील 73 हजार नागरिकांनी भाग घेतला आहे. (Latest Marathi News)

या सर्वेक्षणात मतदारांना विचारण्यात आलं की, मूळ पक्षात वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा नवीन पायंडा मतदार म्हणून मान्य आहे का? यावर 19.1 टक्के लोकांनी योय असं म्हटलं आहे. तर 80.9 टक्के लोकांनी नाही, असं म्हटलं आहे.

मूळ पक्षात वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याचा नवीन पायंडा मतदार म्हणून मान्य आहे का?

हो - 19.1%

नाही - 80.9%

निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपलं मत काय?

निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपलं मत काय? असा प्रश्नही या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. ज्यावर 38.7 टक्के लोकांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, असं महंत मांडलं आहे.

तर 13.2 टक्के लोकांनी नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे, असं मत नोंदवलं आहे. तर 30.1 टक्के लोकांनी कायमस्वरुपी निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी असं म्हटलं असून 18 टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

SCROLL FOR NEXT