Nanded News, Hadgaon Bandh saam tv
महाराष्ट्र

Sakal Maratha Samaj News : बेमुदत उपाेषणाचा 11 वा दिवस, दत्ता पाटील हडसणीकरांची प्रकृती ढासळली; हादगाव बंदला प्रतिसाद

Hadgaon Bandh : आज शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : मराठा समाजाच्या मागण्यासाठी नांदेड येथील हदगाव तालुक्यात आज (साेमवार) सकल मराठा समाजाच्या वतीने हदगाव बंदची (hadgaon bandh) हाक देण्यात आली हाेती. या बंदला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शहरातील बाजारपेठेसह छाेटे छाेटे व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)

मराठा समाजाच्या मागण्यासाठी नांदेड येथील हदगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसनीकर यांनी हडसनी गावात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे उपाेषण गेल्या 11 दिवसांपासून हडसनी गावात सुरु आहे. या उपाेषणामुळे दत्ता पाटील हडसनीकर यांची प्रकृती सध्या खालावली आहे.

दत्ता पाटील हडसनीकर यांच्यावर नांदेड (nanded) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रशासनाने हडसनीकर यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या वतीने आज हदगाव बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला हदगाव तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठेसह छाेटे छाेटे व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT