sakal maratha samaj andolan in dharashiv saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : 'सगेसोयरे' अंमलबजावणी व्हावी, धाराशिवमध्ये मराठा समाज धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाने दिला.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Maratha Andolan :

मराठा आरक्षणाच्या (maratha reservation latest news) मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ धाराशिव येथे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाच्या वतीने आज (मंगळवार) मराठा समाजाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्ह्यातील मराठा बांधवावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आंदाेलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.  (Maharashtra News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव मध्ये सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला.

सरकारने आज मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील मराठा बांधवावर दाखल केलेले सर्व प्रकारचे गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी शेकडो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा धडक मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत महिलांसह युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT